TooBrief TooBrief

Home / Headlines

दुष्काळात तेरावा महिना, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी हातबल

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27

दुष्काळात तेरावा महिना, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी हातबल

राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे सुरुवातीचे दोन आठवडे पाऊस न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. पावसाभावी पिकं वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले होते. अखेर शनिवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 75 टक्के भागामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. पाऊस न पडल्यामुळे शेतकरी आधीच मोठ्या संकटात आहे.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs